Assembly Elections 2024| देशभरातील लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशात एप्रिल आणि मेमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 1 जूनपर्यंत या निवडणुका चालतील. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे देशातील लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यासोबतच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाने लोकसभेसह चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसोबतच या चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत. या चारही राज्यांच्या विधानसभांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहेत.
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेशमध्ये 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 27 मार्चपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. अरुणाचल प्रदेशात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका 20 मार्च 2024 रोजी नोटिफिकेशन येईल.
सिक्किम
सिक्किम विधानसभेसाठी एका टप्प्यात सर्वच्या सर्व 32 जागांवर मतदान होणरा आहे. सिक्किम विधानसभा निवडणुकीची नोटिफिकेशन 20 मार्च रोजी काढली जाणार आहे. 27 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
ओडिशा
ओडिशात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 जागांसाठी मतदान होईल. त्याचं नोटिफिकेशन 18 एप्रिल रोजी काढलं जाणार आहे. उमेदवारांना 25 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 29 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 13 मे रोजी राज्यात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल.
ओडिशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 35 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 26 एप्रिल रोजी नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. तर 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी आणि निकाल लागणार आहे.
आंध्र प्रदेश
आंध्रप्रदेश विधानसभेच्या 175 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणरा आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार आंध्र प्रदेश विधानसभेसाठी 18 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. 25 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे.
तर 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून येथे 13 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा लोकसभेसह या चार राज्यातील विधानसभा निवडणूकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
हेही वाचा: