आळंदी – हुनमानवाडी येथे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय भगवान महिला संघाच्या आळंदी शहर अध्यक्षा शामबाला भांगे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी, जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश ढाकणे, आळंदी पोलिस स्टेशनचे अरूण गर्जे, सर्जेराव भांगे, तानाजी केंद्रे, भागवत मुंडे, दत्तात्रय केंद्रे, शंकर चोले, कमल केंद्रे, राणी गर्जे, संगीता सांगळे, अनिता कातकडे, महानंदा दहिफळे, कामिनी मुंडे, निर्मला गित्ते, ज्योती चोले, मीनाक्षी केंद्रे यांसह आदी उपस्थित होते. जय भगवान महिला महासंघ व महिला मित्र मंडळ यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.