Ajit Pawar Jayanti: अजितदादांच्या जयंतीला अनोखी मानवंदना; पिरंगुट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Ajit Pawar Jayanti: मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.

Ajit Pawar Jayanti – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिरंगुट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 221 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पिरंगुट (ता. मुळशी) येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रक्तदात्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य विम्याचे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले, समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्ताचा प्रत्येक थेंब संजीवनी ठरू शकतो. लोकसेवेचा वारसा जपणारा आणि समाजहिताचा संदेश देणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. कार्यक्रमाला शांताराम इंगवले, सुनील चांदेरे, अंकुश मोरे, कालिदास गोपाळघरे,
दगडू करंजावणे, प्रवीण धनवे, राहुल पवळे, काजल मोरे, यशवंत गायकवाड, धैर्यशील ढमाले, संजय उभे, बाबाजी शेळके, सुखदेव मांडेकर, सुनील वाडकर, संगिता पवळे, चंदा केदारी, निता नांगरे, राजेंद्र दबडे, रमेश पवळे, माऊली साठे, सचिन अमराळे, राजेंद्र नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर यांनी केले, तर माऊली साठे यांनी आभार मानले. रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा ठरला.





