Pune News : अजित पवार यांना रक्तदानातून मानवंदना; कोथरूडमध्ये भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार, लोकनेते दिवंगत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Pune News) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Pune News : महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार, लोकनेते दिवंगत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Pune News) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांच्या पुढाकारातून वसुधा फाऊंडेशन हॉल, कै. मामासाहेब मोहोळ शाळा, केळेवाडी, पौड रोड, पुणे येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात (Pune News) सुमारे दीडशे ते दोनशे रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
दिवंगत स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर समाजहित, विकास आणि जनसेवा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम आयोजित (Pune News) करण्यात आला. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, या भावनेतून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर म्हणाले, “दिवंगत स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर विकास, जनसेवा आणि सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे.
रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांच्या मदतीला धावून यावे. समाजहितासाठी अशा विधायक उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल.”
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी (Pune News) सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांचे हर्षवर्धन मानकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.






