मुंबई – अभिषेक – आराध्याच्या जन्मदिवसानिमित्त ऐश्वर्याने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आराध्याच्या बिर्थडे सेलिब्रेशनचे आहेत. ज्यामध्ये आराध्यसह अभिषेक ऐश्वर्या आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. परंतु याच बिर्थडे फोटोजवरून आता नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
ऐश्वर्याने रात्री उशिरा पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी अंदाज लावले आहेत की बिर्थडे सेलिब्रेशचे हे फोटो आहेत. त्यातील एका फोटोमध्ये ऐश्वर्या आपल्या मुलीला थेट किस करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी आता यावरूनच ऐश्वर्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने फोटोवर कमेंट करत ही आपली संस्कृती नसल्याचे म्हंटले आहे तर दुसऱ्याने हे असे फोटो शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.
माय लव माय लाईफ,आय लव्ह यु आराध्या असे कॅप्शन ऐश्वर्याने फोटो शेअर करताना लिहिले आहे. नेटकऱ्यांनी मात्र चुकीचा अर्थ लावत ट्रोलिंग केल्याचे ऐश्वर्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे. म्हणूनच काही फॅन्सने या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. ऐश्वर्याच्या या पोस्टवर फॅन्स आणि ट्रोलर्सची चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचे दिसून येते.