नवी दिल्ली – दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. एका अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे मनुष्याचे आयुर्मान 9.5 वर्षांनी घटले असल्याची माहिती समोर आली आहे. लंग केअर फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, वायुप्रदूषणामुळे प्रत्येक तिसऱ्या मुलाला दमा होतो.
दिवाळीनिमित्त राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषिण झाले आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा 5 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. दरम्यान, आज दिल्लीवासियांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आज 10 ते 15 किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
Air pollution kills 15 lakh people every year. A report pointed out that people living in Delhi-NCR loses 9.5 yrs of their lives because of air pollution. Lung Care Foundation says every 3rd child has asthma due to air pollution: Vimlendu Jha, Environmentalist pic.twitter.com/9O1p95bvu6
— ANI (@ANI) November 6, 2021