पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्टरी’ (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्यात आली होती. त्यामुळे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्टरी समोर आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या १२ जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
रिफेटक्रीचे नवीन नियम हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणार आहेत. त्यामुळे हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते.
असे आहेत नवीन नियम –
* “रिफेक्टरी’त सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणार
* “रिफेक्टरी’त टीव्ही बंद; विद्यावाणी रेडिओ सुरू
* एकाच ताटात दोघांना जेवण करता येणार नाही
* “रिफेक्टरी’तील जेवण बाहेर नेऊन खाण्यास मनाई