Adani Group Stocks : शेअर बाजारातील मोठ्या घसरणीनंतर अदानी समूहाच्या समभागात (stock) मोठी घसरण झाली आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध झालेले अदानी समूहाचे सर्व 10 समभाग लाल रंगात बंद झाले. सर्वात मोठी घसरण अदानी एनर्जीच्या स्टॉकमध्ये झाली आहे. अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपन्यांचे समभागही घसरणीसह बंद झाले.
अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांमध्ये, अदानी एनर्जीच्या समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून ते 7.18 टक्क्यांच्या घसरणीसह 999 रुपयांवर बंद झाले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 6.39 टक्क्यांच्या घसरणीसह 960.70 रुपयांवर बंद झाले. अदानी पोर्ट्स आणि सेझचे समभाग 5.76 टक्क्यांच्या घसरणीसह 1012 रुपयांवर बंद झाले. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग 5.35 टक्क्यांच्या घसरणीसह 2783 रुपयांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात अदानी समूहाच्या दोन्ही सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. ACC 5.27 टक्क्यांच्या घसरणीसह 2086 रुपयांवर बंद झाला, तर अंबुजा सिमेंट 6.11 टक्क्यांच्या घसरणीसह 490 रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवर 4.98 टक्क्यांच्या घसरणीसह 508.80 रुपयांवर आणि अदानी विल्मर 4.70 टक्क्यांच्या घसरणीसह 346 रुपयांवर बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरही 5.20 टक्क्यांच्या घसरणीसह 1452 रुपयांवर बंद झाला आणि एनडीटीव्हीचा शेअर 5.81 टक्क्यांच्या घसरणीसह 264 रुपयांवर बंद झाला.
शेअर बाजारात मोठी घसरण –
निफ्टीच्या 300 हून अधिक अंकांच्या घसरणीत अदानी समूहाच्या समभागांचा मोठा वाटा आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी, निर्देशांकात समाविष्ट असलेल्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. अलीकडच्या काळात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. बुधवारी सेन्सेक्स 930.88 (1.30%) अंकांनी घसरून 70,506.31 वर तर निफ्टी 302.95 (1.41%) अंकांनी घसरला आणि 21,150.15 वर बंद झाला. शेअर बाजारातील या घसरणीमुळे बीएसईच्या गुंतवणूकदारांना सुमारे 9.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.