मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने 2010 मध्ये सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरीन खान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिच्या फॉलोअर्सशी कनेक्ट राहण्यासाठी ती तिच्या लाईफबाबतचे अपडेट्स देत असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आज अभिनेत्रीने असे फोटो शेअर केले ज्यामुळे चाहते देखील काळजीत पडले आहेत. या फोटोंवरून अभिनेत्री रुग्णालयात ऍडमिट असल्याचे समजते.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. जरीन खानलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवरून चाहते तिला डेंग्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. अभिनेत्रीला खूप ताप, तीव्र अंगदुखी आहे. मात्र ती हळूहळू बरी होत असल्याचे समजते. जरीनने आपल्या इंस्टाग्रामवरून रुग्णालयातील काही फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने इंस्टाग्राम हँडलवरून दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने रुग्णालयातील आपली अवस्था दाखवली आहे. एका फोटोमध्ये सलाईन लावलेला हात आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ज्यूस दिसत आहे. लाईफ अपडेट आणि रिकव्हरी मोड असे कॅप्शन देखील जरीनने यावेळी दिले आहे.जरीनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पोस्टनंतर चाहते तिने लवकर बरे व्हावे यासाठी कमेंट करताना दिसत आहेत.जरीनने वजा तुम हो, हाऊसफुल 2, रेडी, वीरप्पन, अक्सर 2 आणि 1921 सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तिचा शेवटचा चित्रपट हम भी अकेले तुम भी अकेले हा होता. तसेच ती ‘ईद हो जायगी’ नावाच्या म्युजिक अल्बममध्ये देखील दिसली होती.