मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र कियाराची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणजे अनेकजण कियारा गरोदर असल्याची शंका उपस्थित करत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर लग्नाच्या 4 महिन्यातच कियारा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा कियारा आडवाणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कियाराचे बेबी बंप दिसत असल्याने ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोमध्ये कियाराने केसरी रंगाच्या ब्रालेटसोबत मॅचिंग ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केलेली दिसत आहे. पण कियाराच्या बेबी बंपने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कियारा प्रेग्नंट आहे? बेबी बंप स्पष्ट दिसत आहेस. ‘कियाराच्या प्रेग्नंसीची बातमी सिद्धार्थला सांगायला हवी,’ ‘कियारा फक्त मलाच प्रेग्नंट वाटत आहे, की इतरांनाही ती तशीच दिसत आहे,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मात्र अद्याप प्रेग्नंट असल्याच्या बातमीबाबत कियाराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे राजस्थानमध्ये 7 फेब्रुवारी 2023 रोजी विवाह झाला. त्यानंतर आता तिच्या गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहेत.