Lalbaugcha Raja : डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत ‘या’ अभिनेत्री घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; VIDEO व्हायरल !
Jacqueline Fernandez | Parth Pawar | Lalbaugcha Raja – मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेकंदासाठी तरी ज्या ‘राजा’चं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण तास न् तास रांगेत उभे असतात.
राजकीय मंडळी असो वा.. सेलिब्रिटी सर्वच जण राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशत्सोवाच्या पहिल्याच दिवशी अनेक व्हिआयपींनी दर्शन घेतलं. यात आता एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार सोबत दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राजाचे दर्शन घेताना अभिनेत्रीने डोक्यावर ओढणी घेतली होती. तसंच मनोभावे पूजा केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र याच वेळी पार्थ पवार यांच्या एका कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Mumbai, Maharashtra: Actress Jacqueline Fernandez participated in Ganesh Chaturthi celebrations at the Lalbaugcha Raja pandal
(Video Source: Lalbaugcha Raja/YouTube) pic.twitter.com/NKKyJJ8p93
— IANS (@ians_india) August 27, 2025
पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून काही नोटा काढल्या आणि जॅकलिनच्या हातात दिल्या. यानंतर जॅकलिननं त्या नोटा बाप्पााच्या दानपेटीत टाकल्या. यानंतर दोघांनी चरणस्पर्श करत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि दोघेही तिथून निघाले.
मात्र, तिथल्या माध्यमांच्या कॅमेऱ्याने हे दृश्य टिपले. हा व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सह आणखी काही अभिनेत्रींनी दर्शन घेतलं. मात्र, यावेळी जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
गणेशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे. यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे.





