Pune News | इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेला पारदर्शकतेची जोड द्यावी. इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो असे सांगून शासन चांगले काम करणाऱ्यांच्या कायम पाठिशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात दुसऱ्या टप्प्यातील विभाग स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयास प्रथम तर बारामती परिमंडल कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोबतच वाडिया उपविभाग व चाकण एमआयडीसी उपविभागांनीही या स्पर्धेत प्रशस्तीपत्रक मिळविले आहे. अजित पवार यांच्या हस्ते प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, वाडिया उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता सुनिल गवळी, चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके यांचा यावेळी गौरव करण्यात आला.





