Simran Budharup । Lalbaug cha Raja – मुंबईसह देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाचा सातवा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे. तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत असल्याचं दिसून येत आहे.
तर दुसरीकडे व्हीआयपींना रेडकार्पेट अथरून दर्शन दिले जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचे व्हिआयपी दर्शन बंद करा अशी मागणी अनेकांकडून होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील यांदर्भातील पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आहेत.
सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये टीव्ही अभिनेत्रीला बाप्पाच्या दरबारात धक्काबुकी होत असल्याचं दिसून येत आहे. या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे. अभिनेत्री सिमरन बुधरुप हिला लालबागच्या राजाच्या मंडपात महिला बाऊन्सरने धक्काबुक्की केली.
View this post on Instagram
एक बाऊन्सरने तर तिच्या आईलाही धक्का देत तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला. सिमरनने याचा व्हिडिओ सोशल मीडियावरर शेअर केला असून सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. सिमरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सिमरन आणि तिची आली दर्शनासाठी रांगेत उभे होते.
यावेळी तिची आई आपल्या मोबाईलने राजाचं व्हिडिओ शुटिंग करत होती, पण त्यावेळी एका महिला बाऊन्सरने तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल परत मागितला असता सिमरन आणि तिच्या आईला धक्के मारून मंडपाच्या बाहेर काढण्यात आलं. असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.