पुणे – पिस्तूलातून गोळीबार करुन तसेच कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वाघोली येथे घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपीस लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
सुनिल दिलीप झरे (21, रा.ससाणेवस्ती, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.11 नोव्हेंबर 2020 रोजी वाघोली गावचे हददीत इसम सुनिल रामदास गाडे (रा.वाघोली) हे त्यांचे गॅरेजवर होते. त्यांचे सकाळी टेम्पो चालकाशी भांडण झाले होते.
त्याकारणावरून इसम नामे सुनिल दिलीप झरे व त्याचे साथीदारांनी सुनिल रामदास गाडे व त्याचे दाजी यांना जिवे मारण्याचे उद्देशाने कोयत्याने मारहान केली. तसेच सुनिल यांचे दाजी यांचे दिशेने त्यांचेकडील पिस्टलने दोन राउंड फायर करून तेथील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती.
त्याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुनिल दिलीप झरे हा सुमारे सहा महीन्यापासुन फरार राहुन पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान दि.7 जून रोजी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन तपास पथकाला झरे हा हांडेवाडी चौक परीसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.