पुणे – डार्क क्रिकेट अकादमी संघाने वॉरीयर्स संघाला तर आर्यन्स संघाने वॉव संघाला पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या आजच्या लढतीमध्ये डार्क क्रिकेट अकादमी संघाने वॉरीयर्स क्रिकेट संघाला पराभूत केले. वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या. यामध्ये अदिती वाघमारेने २५ (२३ चेंडू, ३ चौकार), निधी शांभवानीने १९ (१९ चेंडू, २ चौकार), परिणीता पाटील १९ (२० चेंडू, २ चौकार) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. वॉरीयर्स संघाकडून वेदिका दळवी व क्रीशी ठक्कर यांनी प्रत्येकी २ तर इशा घुले व सहेज कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
डार्क अकादमी संघाने १७.१ षटकांत २ बाद १०८ धावा करताना विजय साकारला. डार्क संघाकडून सलामीवीर क्रीशी ठक्करने ५३ चेंडूत नाबाद ५५ धावांची (७ चौकार, १ षटकार) खेळी करताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
आर्यन्स संघाने वॉव अकादमी संघाला ४२ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आर्यन्स संघाने निर्धारित १६ षटकांत ३ बाद १२९ धावा केल्या. भक्ती पवारने नाबाद ५५ (४७ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) तर श्रावणी जामदारने ४६ (३८ चेंडू, ५ चौकार) धावा करताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. कार्तिकी आणि साक्षी पानसरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. वॉव क्रीकेट अकादमी संघाने निर्धारित १६ षटकांत २ बाद ८७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
वॉरीयर्स क्रिकेट : २० षटकांत ८ बाद १०७ (अदिती वाघमारे २५, निधी शांभवानीने १९, परिणीता पाटील १९; वेदिका दळवी ४-०-१५-२, क्रीशी ठक्कर ४-०-२८-२, इशा घुले ४-०-२१-१, सहेज कौर ३-०-११-१) पराभूत वि. डार्क अकादमी : १७.१ षटकांत २ बाद १०८ (क्रीशी ठक्कर नाबाद ५५, इशा घुले ३३, श्वेता जाधव १३; उत्कर्षा कदम ३.१-०-१८-१, मधुरा इंगवले ३-०-२०-१).