पिंपरी – पोलीस अधिकारी असल्याने सांगून वारंवार मारहाण केल्याचा प्रकार जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.
साजिद मन्सूर पेंढारी (वय 23, रा. नक्षत्र पीजी, नारायण नगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल नामदेव राठोड (वय 29, रा. परभणी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी यांच्या पेइंग गेस्ट हाऊसमध्ये राहत असलेला मुलगा विकी चव्हाण याने फिर्यादी यांना त्याचा मामा आरोपी राहुल राठोड याच्यासोबत ओळख करून दिली. आरोपीने वेळोवेळी, मी पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार पदावर नोकरी करत होतो. आमच्या ताब्यातील एक आरोपी लॉकअपमध्ये असताना मेला. त्यामुळे मला निलंबित करण्यात आले, असे वारंवार भासवून विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मोबाइल फोनवर फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.