मुंबई – प्राइम व्हिडिओने त्याच्या आगामी ‘अ मिलियन माइल्स अवे’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच केला आहे. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून, जोस हर्नांडेझच्या भूमिकेत मायकेल पिना आहे.जोसे हा अंतराळवीर बनून अंतराळात जाणारा पहिला मेक्सिकन शेतकरी होता. नासाच्या अंतराळवीर जोस हर्नांडेझच्या वास्तविक जीवनातील कथेपासून प्रेरित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच प्रेरित करेल अशी आशा चित्रपटाच्या निर्मात्यांना आहे.
ट्रेलरमध्ये हर्नांडेझ एका शेतकऱ्याच्या रूपात दाखवण्यात आले आहे ज्याला त्याचे अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.यासाठी तो कठोर परिश्रम करत असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.हा चित्रपट मेक्सिकोतील एका गावातून जोस हर्नांडेझच्या आंतरराष्ट्रीय अंतराळपर्यंतचा त्याचा प्रवास दाखवणार आहे.
शेतकऱ्यापासून ते अंतराळवीराची सत्यकथा दाखवणारा हा चित्रपट १५ सप्टेंबर २०२३ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे सीन्सही ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहेत. मायकेल पेना, रोजा सालाझार, बॉबी सोटो, सरयू ब्लू, वेरोनिका फाल्कन, ज्युलिओ सीझर सेडिलो, गॅरेट डिलाहंट आणि एरिक जॉन्सन अशा उत्तम कलाकारांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
हॉलिवूडमध्ये याआधीही अवकाश चित्रपट बनले आहेत. ज्यामध्ये ख्रिस्तोफर नोलनचे इंटरस्टेलर हे अंतराळ, वेळ आणि कृष्णविवरांवर आधारित आहे. अपोलो 3 अंतराळात अडकलेल्या अमेरिकन अंतराळवीरांची कथा सांगते.परंतु हा प्राईमवर प्रदर्शित होणार हा चित्रपट काहीसा वेगळा असणार आहे.