कोल्हापूर – देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आणता येते. ती वेळ काही दिवसांची आहे, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केला आहे. इतकंच नाही तर विधान परिषद निवडणुकीत कोल्हापुरातून अमल महाडिक यांचा विजयाचा दावाही त्यांनी केला.
कोल्हापूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, विधान परिषदेसाठी 6 ठिकाणी 10 तारखेला निवडणूक होत आहे. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. सहा वर्षांपूर्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे.
आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत. नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचे प्राबल्य आहे.
यात 105 भाजपचे, तर कोरे आणि आवडे यांचे मिळून 165 सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी 43 मतं यायला काही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.