तालुक्यात शनिवार (दि.1) पुन्हा 5 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील बाधित रुग्णांची आजपर्यंतची संख्या 211 झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
भोर तालुक्यात बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत आहे. आजपर्यंत तालुक्यात करोनाचे बळी ठरलेले पाचही रुग्ण 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.
बरे झालेल्या 139 जणांना प्रशासनाने घरी सोडलेले आहे. 66 बाधित रुग्णांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरु आहेत. 764 जणांचे स्वॅब तपासले आहेत. आजपर्यंत तालुक्यातील 6 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. भोर शहर वगळता तालुक्यात ज्या गांवात रुग्ण आढळले आहेत. त्या गावात प्रतिबंधीत झोन जाहीर करण्यात आला आहे. आज अहवाल आलेल्या गावात नसरापूर येथे 2, येवली येथे 1, वडगांव येथे 1, भांबवडे येथे 1, अशा 5 जणांचा समावेश आहे. त्यांच्या उपचार सुरू केले आहेत.
दरम्यान, आजपासून भोर शहरातील लॉकडाऊन प्रतिबंधित क्षेत्र वगळता शिथिल करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने अस्थायी नियमांचे पालन व अटी शर्तींवर भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसिलदार अजित पाटील यांच्या परवानगीने सुरु केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.