शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात आज १५ गावात २० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील कोविड केअर सेंटर मधून आज 32 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शिरूर शहरात २ तर शिरूर तालुक्यात १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर शिरूर ग्रामीण रामलिंग रोड वरील एका 65 वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील विठ्ठल नगर येथील 29 वर्षीय पुरुष तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील काम करणारा काची आळी येथील 32 वर्षीय पुरुष असे दोघेजण शिरूर शहरात कोरोना बाधित आढळले असून आज शिरूर शहरातील 15 जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले आहे, तर शिरूर तालुक्यातील विविध गावातील सतरा जणांची कोरोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात २, शिक्रापूर ३, सणसवाडी १, पारोडी १, निमगाव म्हाळुंगी १, शिरूर ग्रामीण २, करंजावणे १, तर्डोबावाडी १, पिंपळे धुमाळ १, कोरेगाव भीमा १, जांबुत १, करंदेि १, आपटी १, सादलगाव २, रांजणगाव गणपती १ असे शिरूर तालुक्यातील पंधरा गावात 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.
शिरूर तालुक्यातील व शिरूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. यावर नियंत्रण करणे आता प्रशासनाला अवघड झाले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी दहा दिवसाचा तालुक्यात अनेक भागात लॉक डाऊन नाही करण्यात आला. परंतु त्याचा फायदा झालेला दिसत नाही. आज पुन्हा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने व प्रशासनापुढे रांजणगाव औद्योगिक वसाहत व शिरूर तालुक्यातील इतर औद्योगिक वसाहत कामगार डोकेदुखी ठरत आहे. परंतु शासनाने औद्योगिक वसाहतीत मोठ्या सूट दिल्याने याकडे सर्व प्रशासनाचे आता दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहे.