शिक्रापूर- येथून चाकणच्या दिशेने निघालेला पिकअप टेम्पो उलटून रस्त्याच्या खाली चारीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून येथील विद्युत खांबाचे नुकसान झाले असून चालक किरकोळ अजखमी झाल आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्याने निघालेला पिकअप टेम्पो (एम एच 12 पीक्यू 5844) अचानकपणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीतून खाली कोसळला.
यावेळी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला टेम्पो आदळला जाऊन विद्युत खांबाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणचे कर्मचारी इंद्रजीत खरसाडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात विद्युत खांबाचे नुकसान झाल्याबाबत पिकअप टेम्पोच्या अज्ञात चालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.