चेन्नई : वेस्ट इंडिज संघाने वन-डे क्रिकेट मालिकेतील सलामीच्या लढतीत यजमान भारतीय संघावर आठ विकेटनी विजय नोंदविला. यासह विंडीजने तीन एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली, पण सामन्यात अपेक्षित षटकांची गती न राखता आल्याने विंडीज खेळाडूंच्या लढतीच्या मानधनातून ८० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेळेपेक्षा चार षटके संथ टाकल्याने सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी हा दंड ठोठावला आहे. याबाबतीत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने आपली चूक मान्य केली आहे.