बॉलिवुडमधील प्रसिद्ध रोहित शेट्टी यांच्या अनेक चित्रपटात हवेत कार उडविण्याचे सीन सर्रास पाहण्यास मिळते. रोहित शेट्टीचा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना उत्सुकता असते की केव्हा कोणती कार हवेत झेप घेण्याचे दृश्य पाहण्यास मिळेल. दरम्यान, रोहित शेट्टीने नुकतीच एक नवीन लग्झरी कार खरेदी केली आहे. रोहितच्या या नवीन कारवर सोशल मीडियावर अनेक फनी कॉमेंट येत आहेत.
रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वीच पिवळया रंगाची एक आलिशान अशी कार खरेदी केली आहे. या कारसोबतचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर लोकांनी त्याला शुभेच्छा देत फनी कॉमेंट केले आहेत. यात एका चाहत्याने म्हटले आहे की, “रोहित सर, कृपा करून गाडी हवेत उडवू नका. तर अन्य एकाने पोस्ट केले की, पुढील चित्रपटात ही कारही हवेत उडताना दिसेल.
रोहित शेट्टीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आगामी “सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. रोहित शेट्टीच्या “सिंघम’ सीरीज आणि “सिंबा’नंतर हा चित्रपट पडद्यावर येत आहे. यात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय रोहित शेट्टी पुढील प्रॉजेक्टमध्ये फराह खानसोबत काम करणार आहे.