मंचर येथे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन
मंचर – निवडणुका सत्ता आणि पदासाठी जिंकलो नाही. तर सर्वसामान्य लोकांची कामे आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.चाकण, रांजणगाव, कारेगाव एमआयडीसीत स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार देण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मतदार आणि कार्यकर्त्यांचा आभार मेळावा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, जुन्नर तालुक्याचे अतुल बेनके, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक सदाशिव पवार, केशरताई पवार, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजु इनामदार, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, विश्वास कोहकडे, किरणताई वळसे पाटील, पुर्वाताई वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, अरुणा थोरात,आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, क्रांतीताई गाढवे, सोमनाथ काळे, निलेश थोरात, प्रमोद कानडे, बाबासाहेब खालकर, सचिन भोर, जयश्री मोढवे, सुषमा शिंदे, वसंतराव भालेराव, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीष बापट यांच्या आशिर्वादामुळे शिवसेना पक्ष विधानसभा निवडणुकीत हद्दपार झाला आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अब की बार 220 के पार, अशी घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची निवडणुकीत मतदारांनी वाट लावली. प्रास्ताविक निलेश पडवळ तर कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांनी
आभार मानले.