श्रीनगर (Lok Sabha polls) – नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीर खोऱ्यातील तीनही जागांवर आपले पत्ते उघडले आहेत. शुक्रवारी, पक्षप्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी जाहीर केले की, ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) हे बारामुल्ला ( Baramulla) मतदारसंघातून उमेदवार असतील आणि आगा रुहुल्ला हे श्रीनगरमधून एनसीचे उमेदवार असतील. यापूर्वी मियां अल्ताफ यांना अनंतनाग-राजोरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. (Lok Sabha polls: Omar Abdullah to contest elections from Baramulla)
आपल्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आमची लढाई विरोधी उमेदवारांच्या मागे उभ्या असलेल्या शक्तींशी आहे. भाजप नेते तरुण चुग यांचे काश्मीरमध्ये आगमन आणि सज्जाद लोन आणि अल्ताफ बुखारी यांची भेट यावरून हे पक्ष भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप ओमर यांनी केला आहे.
ओमर यांनी भाजप, डीपीएपी आणि पीपल्स कॉन्फरन्सवर निशाणा साधला. नॅशनल कॉन्फरन्स या सर्व विरोधी पक्षांना भाजपची बी टीम म्हणत आहे. तर प्रत्युत्तरात या पक्षांचे म्हणणे आहे की, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी गेल्या काही वर्षांत भाजपसोबत सरकारमध्ये आहेत.
त्याचवेळी विधानसभा निवडणुकीबाबत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप हे काम करून जनतेवर कोणतेही उपकार करत नाहत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे होणार आहे. माझी नुकतीच लढलेली विधानसभेची जागा सीमांकनानंतर उत्तर काश्मीरमध्ये विलीन करण्यात आली आहे. त्याबद्दल भाजपचे आभार.