South Cinema | साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ या चित्रपटाच्या चर्चेत आहे. या अभिनेत्याच्या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. थलपथी विजय पूर्णपणे राजकारणाचा भाग होण्याआधी त्यांची सर्व पेंडींगची कामे पूर्ण करण्यात आली आहे. सुपरस्टारच्या आगामी प्रोजेक्टपैकी एक द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहे
विजयकडे सध्या दोनच चित्रपट आहेत आणि याशिवाय तो कोणताही नवीन चित्रपट साईन करणार नाही. अशात सुपरस्टारचे चाहतेही भावनिक झाले आहे. दरम्यान, थलपथी 69 बाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थलपथी विजयने त्याच्या चित्रपटासाठी मोठी रक्कम जमा केली आहे. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असे मानले जात आहे. निर्माता DVV दानय्या थलपाथी 69 चित्रपटासाठी पैसे गुंतवत होते. अगदी निर्मात्यांनी थलपाथीची २०० कोटी रुपये फी घेण्यास होकार दिला होता. पण विजयची दिग्दर्शक निवड आणि फी वाढवण्याच्या मागणीमुळे दानय्याला चित्रपट सोडावा लागला.
रिपोर्टनुसार, विजयने एच विनोथला ‘थलपाथी 69’ चे दिग्दर्शन करण्यासाठी बोर्डात आणले होते. मात्र निर्मात्यांनी दिग्दर्शकाचे नाव मान्य केले नाही. याशिवाय थलपथीने आपली फी 200 ऐवजी 250 कोटी रुपये करण्याची मागणी केली होती. पण दिग्दर्शक एड विनोथच्या नावावर इतके पैसे द्यायला तयार नव्हते.
ट्रॅक टॉलीवूडच्या रिपोर्टनुसार, DVV दानय्याने थलपथीला 200 कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्याचे मान्य केले होते. तामिळ सुपरस्टार आणि तेलुगू दिग्दर्शकाची जोडी जबरदस्त असेल असं त्याला वाटत होतं. पण नंतर त्यांनी काही कारणास्तव या चित्रपटातून स्वत:ला काढून घेतले आहे.
हे वाचले का ? नोरा फतेहीने बॉलिवूड कपल्सबाबत केला खुलासा, म्हणाली,’फक्त पैसे, आणि चित्रपट हिट करण्यासाठी लग्न करतात’