Trending News । जगभरातील आबाल वृद्धांना सुपरमॅन या पात्राचे आकर्षण आहे मोठ्या पडद्यावरवर चित्रपटाच्या स्वरूपात सुपरमॅनचे दर्शन होण्यापूर्वी सर्वांना पुस्तकाच्या आणि कॉमिक बुक स्वरूपात त्याचे प्रथम दर्शन झाले होते 1938 मध्ये सर्वात प्रथम कॉमिक स्वरूपात सुपरमॅन प्रदर्शित झाला होता.
त्यावेळी प्रदर्शित झालेल्या पहिल्या कॉमिक बुकची नुकतीच लिलावात विक्री करण्यात आली आणि त्या पहिल्या कॉपीला तब्बल साठ लाख डॉलर्स एवढी रक्कम मिळाली हेरिटेज ऑक्शन्स या कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे 1938 मध्ये ॲक्शन नंबर वन या हेडिंगखाली सुपरमॅनचे सर्वात प्रथम दर्शन चाहत्यांना झाले होते.
गेल्या सुमारे 86 वर्षांच्या कालावधीमध्ये 1938 साली प्रदर्शित झालेल्या या कॉमिक बुकच्या 100 कॉपी अस्तित्वात असल्याची माहिती हेरिटेज कंपनीला मिळाली होती त्यापैकी जी पहिली कॉपी होती त्याचा लिलाव करण्याचा निर्णय कंपनीने घेतला लिलाव सुरू असताना तब्बल साठ लाख डॉलर्सला एका चाहत्याने हे कॉमिक बुक खरेदी केले एखाद्या ओरिजिनल कॉमिक बुकला एवढ्या एवढी प्रचंड किंमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी सुपरमॅन नंबर वन या कॉमिक बुकची 2022 मध्ये 53 लाख डॉलरला विक्री झाली होती.