‘पंकजाताई, दानवेंचा पराभव होणारच’ या नेत्याचा मोठा ‘दावा’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त झाला. त्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मॅरेथॉन प्रचाराला पूर्णविराम मिळाला. आता अखेरच्या टप्प्यासाठी आज शनिवारी (दि.१ जून) देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागांसाठी मतदान होईल. त्या जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीचाही समावेश आहे. अंतिम टप्प्यात एकूण ९०४ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
अशात ४ जूनला येणाऱ्या निकाला आता राजकीय नेते दावे करत आहेत. अशात मोदी सरकारचे नेते ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहे तर इंडिया आघाडीचे नेते आपलेच सरकार येणार असल्याचा दावा करत आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले,’मराठवाड्यातील आठही जागा महाविकास आघाडीला मिळतील. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचेही संकेत मिळत आहेत. ते दोघेही निवडून येत नाहीत, असे भाजपचेच लोक म्हणत आहेत. मागच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनीच मला पाडले होते, त्यामुळे परमेश्वर बदला घेत असतो, असा दावा खैरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’राज्यात महाविकास आघाडीच्या 32, तर महायुतीच्या 16 जागा निवडून येतील. असेही ते म्हणाले आहे. शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी तुम्हाला संपलेले दिसतील. खोके घेणाऱ्यांचा लोकांना प्रचंड राग येतो. ज्यांनी मोठं केलं, त्यांच्या विरोधात हे लोक जातात, तर जनतेशी त्यांचा काय संबंधच येत नाही. मी निवडून यावं; म्हणून अनेकांनी अनेक देवांना नवस केले आहेत. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. तो गड कुठे जाऊ शकत नाही. आमच्यासाठी मित्रपक्षांनही मेहनत घेतली आहे, त्यामुळे संभाजीनगरमधून माझा विजय निश्चित आहे, असेही खैरे यांनी नमूद केले आहे.
हे वाचाल का ?
रवी किशन गोरखपूर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले





