Lok Sabha Election 2024| महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काल मंगळवारी मुंबईतील शिवालय येथे पत्रकार परिषदेत महाविकास आघाडील तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा, माढा आणि रावेर या तीन जागांवर उमेदवारी जाहीर होऊ शकते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे , नगरमधून निलेश लंके आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं होतं. 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यात बीड आणि भिवंडीतील उमेदवारी जाहीर झाली होती. Lok Sabha Election 2024|
दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीकडून 21-17-10 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागाबाबत काँग्रेस आणि शिवसेना गटात वाद सुरू होता. अखेर सांगलीची जागा शिवसेना अर्थात ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे.
राष्ट्रवादी 10 जागा Lok Sabha Election 2024|
वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर या 10 जागांवर काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यात सातऱ्यातील जागेसाठी शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे साताऱ्यासह रावेर, माढा या जागांसाठी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; देवेंद्र फडणवीसांनी लगेच मानले आभार, ट्विट करत म्हणाले…..