तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलचा रौप्य महोत्सव समारंभ विविध बौद्धिक, सांस्कृतिक, विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट प्रकल्पाचे प्रदर्शनाचे माध्यमातून उत्साहात पार पडला.
या कार्याक्रमाचे प्रसंगी आमदार सुनील शेळके, प्रा. डॉ. सुधाकर जाधव, संस्थेचे अध्यक्ष दीपक शहा, शालेय समिती अध्यक्ष प्रकाश ओसवाल, सचिव इंदरकुमार ओसवाल, उद्योगपती राजेशजी शहा तसेच संचालक दिलीप पारेख, किरण परळीकर, रिकबचंद गुंदेशा, प्रदीप शहा, महेंद्र राठोड, तेजस वाडेकर, संकेत ओसवाल, सिद्धार्थ शहा, रणजीत ओसवाल, विलास शहा, अजय शहा, श्रीमंत सरदार उमाराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, मुख्याध्यापिका अपूर्वा टकले, शुभांगी भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. सुधाकर जाधव, उद्योगपती राजेशजी शहा यांनी शाळेच्या पंचवीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार शेळके यांनी चोख आणि पारदर्शक काम करणारी शाळा म्हणून कौतुक केले. याप्रसंगी विज्ञान दिनाचे औचित्य साधून तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या मेगा सायन्स एक्जीबिशनचा बक्षीस समारंभ पार पडला. शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ दीपक शहा यांनी शाळेच्या उंचावलेला आलेखाबद्दल परिचय आपल्या मनोगतातून करून दिला. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी केले. अतिथीं परिचय अनघा कुलकर्णी यांनी करून दिला. सूत्रसंचालन कविता फाकटकर, आरती पेंडभाजे यांनी केले. आभार राकेश ओसवाल यांनी मानले.