Chinmay Mandlekar| अभिनेता चिन्मय मांडलेकरने अभिनयासह अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. खासकरून त्याच्या ऐतिहासिक भूमिकेसाठी अधिक ओळखला जातो. मात्र अभिनयासह चिन्मय त्याच्या लिखाण शैलीमुळेही प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याने झी नाट्य गौरव पुरस्कारपुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी चिन्मयने नाटकादरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.
चिन्मयने सांगितले की, “नाटकाच्या तालमीत किंवा नाटकाच्या प्रयोगांमध्ये अनेक गमतीजमती आणि विनोदी किस्से घडत असतात. पण माझी जी एक आठवण आहे ती माझ्या एका सहकलाकाराबद्दलची आठवण आहे. तो सहकलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. ते नाटक खूप गाजलं होतं.” Chinmay Mandlekar|
“एका प्रयोगामध्ये सिद्धार्थला ब्लॅकआऊटमध्ये नेमक कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरून खाली पडला. त्याच्यानंतर अख्खा प्रयोग त्याच्या डोक्यातून भळभळत रक्त वाहत होते आणि ती जखम तशीच घेऊन त्याने पुढचा सगळा प्रयोग पूर्ण केला. तेव्हा स्टेजवरच्या लोकांना खूप भीती वाटत होती की सिद्धार्थचं इतक रक्त वाहतंय, कदाचित तो चक्कर येऊनही पडू शकतो. पण अशा अवस्थेत सिद्धार्थने प्रयोग पूर्ण केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सिद्धार्थच्या या स्पीरीटसाठी हॅट्स ऑफ. ” Chinmay Mandlekar|
चिन्मयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर, त्याने शेरशिवराज, पावनखिंड, फत्तेशिखस्त,फर्जंद, शिवरायांचा छावा या सिनेमातही महाराजांची भूमिका साकारलेली आहे. ‘सुभेदार’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तो शेवटचा दिसला होता. तर द कश्मिरी फाइल्स आणि गांधी गोडसे या हिंदी सिनेमातही त्याने भूमिका साकरलेली आहे. काश्मिरी फाइल्स या सिनेमातून त्याने हिंदी रसिकांचीही मन जिंकून घेतली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला ; TMC नेत्याच्या घरी तपासादरम्यान जमावाकडून दगडफेक