Dr. Tanmay Motiwala SBI Shares : प्रत्येक जण आपल्या पुढील पिढीला काहीतरी चांगलं देण्यासाठी नेहमीच गुंतवणूक करत असतो. मात्र अचानक तुमच्या कुटुंबीयांनी केलेली गुंतवणूक माहिती नसताना तुम्हाला त्याचा भरमसाठ मोबदला मिळाला तर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असेल ? तुम्ही गोंधळून जाल.. असाच काहीसा प्रकार बालरोगतज्ञ डॉ.तन्मय मोतीवाला यांच्यासोबत घडला आहे. कोणे एकेकाळी त्यांच्या आजोबानी घेतलेल्या शेअर्सची माहिती त्यांना तब्बल तीस वर्षांनी मिळाली आणि ते लखपती झाले.
तन्मय मोतीवाला यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ते मूळचे चंदीगडचे रहिवासी आहेत. कुटुंबाशी संबंधित काही कागदपत्रे शोधताना त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे शेअर सर्टिफिकेट सापडले. हे प्रमाणपत्र पाहिल्यानंतर तन्मय मोतीवाला यांना कळले की त्यांच्या आजोबांनी 1994 मध्ये एसबीआयचे 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले होते. आजोबांनी हे शेअर कधीच विकले नाहीत आणि त्याबद्दल सांगायलाही विसरले. | Dr. Tanmay Motiwala SBI Shares
या 30 वर्षांच्या कालावधीत एसबीआयच्या शेअर्सने मल्टीबॅगर रिटर्न दिले आणि आता तन्मय मोतीवाला यांच्या त्या जुन्या पाचशे रुपयांच्या शेअर्सची किंमत 3.75 लाख रुपये आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला आनंद व्यक्त करताना, डॉ. मोतीवाला यांनी लिहिले – गुंतवणूक फार मोठी रक्कम नव्हती पण हो 30 वर्षांत 750 पट परतावा दिला आहे. प्रत्यक्षात ही मोठी रक्कम आहे. | Dr. Tanmay Motiwala SBI Shares
डीमॅट स्वरूपात शेअर्सची देवाणघेवाण
यासोबतच डॉ.मोतीवाला यांनी त्यांच्या कुटुंबाची स्टॉक प्रमाणपत्रे डीमॅट स्वरूपात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यामध्ये येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून ते म्हणाले की, या अवघड प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी सल्लागाराची मदत आवश्यक होती. मात्र, दीर्घ प्रक्रियेनंतर हे शेअर्स आता डीमॅट स्वरूपात रूपांतरित करण्यात आले आहेत. डॉ. मोतीवाला यांनी त्यांच्या आजोबांचे हे शेअर्स कायम ठेवण्याच्या इराद्याबद्दलही माहिती दिली.
The power of holding equity 😊
My Grand parents had purchased SBI shares worth 500 Rs in 1994.
They had forgotten about it. Infact they had no idea why they purchased it and if they even hold it.I found some such certificates while consolidating family’s holdings in a… pic.twitter.com/GdO7qAJXXL
— Dr. Tanmay Motiwala (@Least_ordinary) March 28, 2024
सध्या SBI चे शेअर्स 767.35 रुपयांवर आहेत. मागील ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत शेअरच्या किमतीत 1.21% वाढ झाली आहे. 7 मार्च रोजी या शेअरने 793.50 रुपयांची उंची गाठली. हा समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. एप्रिल 2023 पर्यंत शेअरची किंमत 519 रुपयांपर्यंत घसरली होती. हा 52 आठवड्यांचा लो आहे. | Dr. Tanmay Motiwala SBI Shares