Gold-Silver Price| सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. सोन्या-चांदीच्या दरातही आज (2 एप्रिल) वाढ झाली आहे. याआधी सोमवारी उच्चांकाचा नवा विक्रम झाला. 24 कॅरेट सोन्याची किंमत 497 रुपयांनी वाढून 6996.8 रुपये प्रति ग्रॅम झाले आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6409 रुपये प्रति ग्रॅम झाली आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा दर सुमारे 400 रुपयांहून अधिक वाढला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 68,560 रुपयांच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीने जवळपास 600 रुपयांची उसळी घेतली आहे.
एक किलो चांदीचा दर 76,100 रुपयांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरीस 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असे बाजारातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती
मुंबई
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 62,847 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 68,560 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 62,847 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 68,560 रुपये आहे.
नागपूर
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 62,847 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 68,560 रुपये इतका आहे.
नाशिक
22 कॅरेट सोन्याचा दर 62,847 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 68,560 रुपये आहे.
हेही वाचा:
शेअर बाजार सपाट उघडल्यानंतर घसरला ; सेन्सेक्स 73,900 च्या खाली, निफ्टीमध्ये थोडी हालचाल