GT vs SRH : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामना पार सुरु आहे. दरम्यान हैदराबाद सनरायझर्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात काहीशी खराब झाली. त्यातून सावरून सनरायझर्सने 8 गडी गमावून 20 ओव्हर्समध्ये 162 रन्स केले. | GT vs SRH
हैदराबाद संघाने 20 व्या षटकात तीन विकेट गमावल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा आला. या षटकात त्याने फक्त तीन धावा दिल्या. तसेच दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. मोहितने एकूण तीन विकेट घेतल्या. तर हैदराबादसाठी समदने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. अभिषेकने 20 चेंडूत 29 धावा केल्या. | GT vs SRH
Innings Break!
An impressive bowling display from @gujarat_titans 👌 👌
Mohit Sharma shines with 3⃣ wickets!
Will @SunRisers defend the total? 🤔
Stay Tuned ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/hdUWPFsHP8#TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/YAILjbkeAv
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट. | GT vs SRH