Bjp Candidates Fifth List । लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. ही यादी दुपारी जाहीर करण्यात असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये पाच राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. या यादीबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पाचव्या यादीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या नावांवर विचारमंथन करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार,यूपीमधील उर्वरित 24 जागांपैकी (ज्यासाठी उमेदवार घोषित केले जाणार आहेत) 10 जागांसाठी नावे निश्चित करण्यात आलीत.
गाझियाबादमधून अतुल गर्ग यांना संधी मिळू शकते, मेरठमधून अरुण गोविल यांना संधी मिळू शकते, तर सहारनपूरमधून राघव लखनपाल आणि मुरादाबादमधून कुंवर सर्वेश सिंग यांना उमेदवारी मिळू शकते.
धर्मेंद्र प्रधान – संबित पात्रा यांची तिकिटे निश्चित! Bjp Candidates Fifth List ।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ओडिशातील 21 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. संभलपूरमधून धर्मेंद्र प्रधान, पुरीतून संबित पात्रा आणि भुवनेश्वरमधून अपराजिता सारंगी यांना तिकीट दिले जाऊ शकते. दोन विद्यमान खासदारांनाही काढून टाकले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले.
भाजप सीईसी बैठकीत ओडिशाच्या सर्व 21 जागांवर चर्चा
भाजपच्या ओडिशा युनिटचे अध्यक्ष मनमोहन सामल यांनी मीडियाला सांगितले की सीईसीने ओडिशातील सर्व 21 लोकसभा आणि 147 विधानसभा जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. ओडिशात भाजप आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात निवडणूकपूर्व युतीवर एकमत न झाल्याने ही चर्चा झाली.
पुढील बैठकीत बिहार-महाराष्ट्रावर चर्चा Bjp Candidates Fifth List ।
बैठकीत राजस्थानच्या आठ जागांवर चर्चा झाली, तर पश्चिम बंगालच्या उर्वरित सर्व जागांवर चर्चा झाली. मात्र, राज्यातील तीन जागांची चर्चा अद्याप बाकी आहे. पक्षाच्या सीईसीच्या पुढील बैठकीत बिहार आणि महाराष्ट्रावर चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात आले.