वाघोली, (प्रतिनिधी)- पुणे प्रादेशिक पूर्व विभाग अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.समाजसेवक संपत गाडे यांनी पाटील यांना शाल, पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
नागरिकांकडून पोलिसांना सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले. कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस दलाकडून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबत संपत गाडे यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.