Lok Sabha Election 2024 । BJP Candidate Third List : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्या भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. पक्षाकडून 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे.
आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली करण्यात आली आहे. भाजपाने याआधी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून, आज जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत ऐकून 9 उमेदवारांचा समावेश आहे.
मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीतही जागावाटपाची चर्चा सुरू असल्याने काँग्रेसच्या राज्यातील यादीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
BJP releases its third list of candidates for the upcoming Lok Sabha elections.
K Annamalai to contest from Coimbatore, Tamilisai Soundararajan from Chennai South and L. Murugan from Nilgiris. pic.twitter.com/bJLUyK8Og1
— ANI (@ANI) March 21, 2024
भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14,
झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.