Asha Bhosle । प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी 10 वर्षांच्या असताना त्यांचे पहिले गाणे रिलीज केले. आता त्या 90 वर्षांच्या आहे आणि या वयातही त्या तब्बल 18 गाणी सतत गाऊ शकतात असे आशा भोसले यांनी सांगितले आहे. 9 मार्च रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये त्या ब्रेक न घेता १८ गाणी गाणार आहे.
आशा भोसले म्हणाल्या,’मी जर जास्त काळ जगले तर मी महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र जाईन आणि शो करेन. माझ्या शोचे नाव ‘वो फिर नहीं आती है’ आहे. मीही पुन्हा येणार नाही… ती व्यक्ती दिसली नाही याची खंत कधीच नसावी. लोक म्हणतात की आम्ही किशोर कुमार आणि इतर गायक (कार्यक्रम सादर करताना) पाहिले नाहीत. पण तुम्ही म्हणू शकता की आम्ही आशा भोसले (कार्यक्रम सादर करताना) पाहिले.’
गाणे ही माझी आवड असल्याचे आशा दीदी यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या,’मला गायनामुळे प्रसिद्धी मिळाली, लोक मला ओळखू लागले. मी काम करत नसतानाही गाणे म्हणतच राहते. मी सराव करत राहते. मी गाणे कधीच सोडले नाही, म्हणूनच माझा आवाज अजूनही चांगला आहे. आवाजाची काळजी घेणे म्हणजे शरीराची काळजी घेण्यासारखे आहे. मी इतरांसाठी रियाज करत नाही. मी माझ्यासाठी रियाज करते कारण मला ते आवडते. मी 10 वर्षांची असताना माझे पहिले गाणे गायले होते. आणि तेव्हापासून 80 वर्षे उलटली आहे. मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत’ असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे.
हेही वाचा
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी काठी घेऊन मिरवणुकीत युवकांना केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल