Lok Sabha Election Navjot Singh Sidhu on bjp । देशात लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. नुकतीच राज्यसभेची उमेदवारी सर्व पक्षांकडून जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे चित्र पाहायला मिळते अशात. गेल्या १० वर्षात भाजपकडून सर्रासपणे फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो.
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडत भाजप पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तसेच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सोबत त्यांचे जवळचे संबध होते. मात्र त्यांनी राज्यसभा निवडणणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश घेतला. असेच काहीसे चित्र पंजाबमध्ये दिसत आहे.
Lok Sabha Election Navjot Singh Sidhu on bjp । नवजोत सिंह सिंदधू यांची नाराजी
नवजोत सिंह सिंदधू हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जातात. अशात पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सिंद्धू आणि काँग्रेस यांच्या मतभेद झाले होते. नवजोत सिंह सिंदधू प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध असूनही सिद्धू यांना पंजाब काँग्रेसची साथ मिळाली नाही. तेव्हा पासूनच नवजात नवजोत सिंह सिद्धू नाराज असल्याची चर्चा आहे.
Lok Sabha Election Navjot Singh Sidhu on bjp । नवजोत सिंह सिंदधू लवकरच भाजपमध्ये प्रवेश ?
2017 मध्ये सिद्धू यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिद्धू यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाईल. याआधी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
राजकीय वर्तुळत चर्चा अशाही आहे की नवजोत सिंह सिंदधू लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप तिकीट देणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नवजोत सिंह सिंदधू भाजप पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याही चर्चा आहे. भाजप सिंद्धू यांना’अमृतसरमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
हेही वाचा
Prakash Ambedkar । विधेयकावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल म्हणाले,’काँग्रेसची नेमकी भूमिका काय ?