Sahil Khan : अभिनेता साहिल खान दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. साहिलने 21 वर्षाच्या मॉडेलसोबत लग्नगाठ बांधली आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्याने 2024 मध्ये दुसरे लग्न केले आहे. साहिलने त्याच्या पत्नीचे फोटो आणि सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साहिलचे पत्नीसोबचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साहिलनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये साहिल म्हणतो, “माझी सुंदर बायको” साहिलच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये साहिल खान आणि त्याची पत्नी हे दोघे मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
View this post on Instagram
साहिल खानने 2003 मध्ये निगार खानशी लग्न केले पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. साहिल खान आणि निगार खान यांचा 2005 साली घटस्फोट झाला. आता या अभिनेत्याने 2024 मध्ये दुसरे लग्न केले आहे. साहिल खानने आपल्या पत्नीसोबत तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला होते, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचे फोटो साहिलनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये साहिलची पत्नी रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. साहिलने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
दरम्यान, साहिल खाननं 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. यानंतर अभिनेता ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादीन’ सारख्या काही चित्रपटांमध्ये दिसला. मात्र, नंतर या अभिनेत्याने इंडस्ट्री सोडली आणि बिझनेस करण्यास सुरुवात केली.