Entertainment : दाक्षिणात्य सुपरस्टार ‘केजीएफ’ फेम यश त्याच्या अभिनयासह लुकमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर यशचा एक फोटो व्हायरल होत आहे. यातील त्याच्या कृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांची मन जिंकली आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये यश एका किराणाच्या दुकानाबाहेर दिसत आहे. तो नुकताच चित्रापुर मठ येथे गेला होता. तेव्हा पत्नी राधिकाही त्याच्याबरोबर होती. यादरम्यान यावेळी यश एका किराणाच्या दुकानात जातो आणि तेथून पत्नीच्या आवडीची आइस कँडी खरेदी करतो. यादरम्यान एका चाहत्याने यशचा फोटो कॅमेऱ्यात कॅप्चर केला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Rocking Star Yash purchases ice candy for his wife Radhika from a small grocery shop.
Despite huge stardom, #Yash remains simple and humble
This is during their recent… pic.twitter.com/YTRW6av6xJ
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) February 17, 2024
पहिल्या फोटोमध्ये यश किराणाच्या दुकानात उभा असल्याचे दिसत असून त्याची पत्नी स्टूलवर बसलेली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेता एका डब्यातून चॉकलेट घेताना दिसत आहे. यशच्या याच कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहे. यशच्या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशच्या साधेपणाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे.
यश आणि राधिकाची लव्हस्टोरी
‘मिस्टर अँड मिसेज रामाचारी’ या चित्रपटानंतर यश आणि राधिकाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांची पहिली भेट ‘नंदा गोकुला’ चित्रपटादरम्यान २००७ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांचा साखरपुडा आणि ९ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले. त्यांना एक आणि मुलगा आणि मुलगी आहे.