Prajkata Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आगामी चित्रपटासह वैयक्तिक गोष्टीबाबत प्राजक्ता चाहत्यांसोबत माहिती शेअर करताना दिसते. नुकतेच तिने तिच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
प्राजक्ता शेवटची ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटानंतर प्राजक्ता ‘भिशी मित्र मंडळ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या मुहूर्त दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “ह्या वर्षातल्या पुढील चित्रपटाला प्रारंभ; नुकतंच पुण्यामध्ये चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. २०२४ हे वर्ष मला खूप बिझी ठेवणार अशी शक्यता आहे. मी पोस्ट कोल्हापूरातून लिहिते. माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी मी खूपच उत्सुक आहे.”
View this post on Instagram
या चित्रपटाचे कथानक भिशीबद्दल आहे. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना पैसे वापरायला देतात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून चिठ्ठी काढून ज्याचे नाव येईल त्याला पैसे दिले जातात.
सागर पाठक यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. तसेच सुमित संघमित्र हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या शुटींगला लवकरच पुण्यात सुरु होणार आहेत. या चित्रपटात प्राजक्तासोबत कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.