तळेगाव दाभाड, (वार्ताहर) – माळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १२५ रूग्णांची नेत्र तपसणी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.दिलीप टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव येथे ही शिबिर घेण्यात आले. या वेळी तळेगाव जनरल हॉस्पिटल व लायन्स क्लब तळेगाव यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले.
या वेळी स्वं.दिलीप टाटीया यांच्या प्रतीमेचे पूजन करुन हभप गुलाब महाराज कुंभार यांचे प्रवचन झाले. शिबिरात नेत्र तपासणी, रक्तदाब, मधूमेह व इतर वैद्यकीय तपसणी करण्यात आली. या वेळी ४१ गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर, ३७ रूग्णांची मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे, डॉ. प्रियंका काळोखे, तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या डॉ. गार्गी मेहता, अनामीक सिंग, सुनीता सिंगे, संचीता कुडेकर, डॉ. किशोर चव्हाण यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले.
या वेळी माजी सभापती शंकर सुपे, बाळासाहेब खंडागळे, जालिंदर मेठल, दशरथ दगडे, सुनिल माकर, बाळासाहेब घाडगे, शंकर बो-हाडे, यमाजी बो-हाडे, सहादू कोकाठे, किसन सुपे, रोहिदास कोकाटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचलन डी. व्ही. शिंदे यांनी केले. राजेंद्र भांड, संतोष बारसकर, तुषार पवार, सुनील गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अशोक सुपे नियोजन केले,