Stock Market: सरकारी कंपनी ओएनजीसीच्या शेअरच्या (ONGC Share) किमतीत आज म्हणजेच सोमवारी 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर आज निफ्टी-50 मध्ये सर्वाधिक वाढणारा ठरला. या स्टॉकने एकदा 254.16 रुपयांची 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली होती. ओएनजीसी ही पीएसयू (Public sector undertakings) कंपनी आहे.
तेजीचे कारण काय?
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास ओएनजीसीकडे वाढला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला कच्च्या तेलाचा व्यापार प्रति बॅरल 75 डाॅलर वर होता. जे प्रति बॅरल 82 डाॅलर पर्यंत वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ हे मुख्यत्वे हौथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे होत आहे.
हौथी बंडखोर लाल समुद्रात तेलाच्या टँकरवर सातत्याने हल्ले करत आहेत. त्यामुळे तेल व्यापार गंभीर संकटाचा सामना करत आहे. या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
तज्ञांच्या काय अपेक्षा आहेत?
काही शेअर बाजार तज्ज्ञांनी आधीच कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. 2025-26 या आर्थिक वर्षात तेल प्रति बॅरल 85 डाॅलर पर्यंत पोहोचू शकेल असा विश्वास वर्तवला होता. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा अर्थ असा आहे की सरकार आगामी काळात विंडफॉल कर वाढवण्याची शक्यता आहे.
6 महिन्यांत 45% शेअर –
या PSU (Public sector undertakings) स्टॉकच्या किमती गेल्या एका महिन्यात 45 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्याचवेळी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या वर्षभरात 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कंपनीमध्ये सरकारची एकूण भागीदारी 58.9 टक्के आहे.
(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)