Entertainment : ‘सारेगमप लिटील चॅम्पस’ या शोममधून प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या शोपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता आयुष्यभरासाठी एकत्र बांधला गेला आहे. मागील महिन्यात प्रथमेश आणि मुग्धा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 21 डिसेंबर 2023 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नुकताच त्यांच्या विवाहाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त मुग्धाने लग्नातील अनसीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी विवाहसोहळा पार पडला, त्या हॉलच्या दृष्यापासून व्हिडीओची सुरुवात होते. दरम्यान, या व्हिडीओमधील मुग्धा व प्रथमेशच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ शेअर करत मुग्धाने “सर्वात शुद्ध व अनंतकाळापर्यंत कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला एक महिना पूर्ण झाला आहे”, अशी कॅपशनही दिली आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘डंकी’ या चित्रपटातील ‘ओ माही’ हे रोमॅंटिक गाणे लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर मुग्धाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 21 डिसेंबर 2023 रोजी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या विवाहसोहळा कुटुंबिय, जवळचे नातेवाईक तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत चिपळून येथे पार पडला. साध्या आणि पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचे सर्वत्र कौतुक केले जात होते. तर नोव्हेंबर महिन्यात 5 तारखेला प्रथमेश आणि मुग्धाचा साखरपुडा पार पडला होता. त्याआधी काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या बहिणीचंही लग्न पार पडले होते.