Samsung Galaxy S24 – सॅमसंगच्या Galaxy S24 सिरिजची अनेक महिन्यांपासून चर्चा होती. अखेर आज सॅमसंगने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सॅमसंगने अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅप सेंटरमध्ये वार्षिक इव्हेंट आयोजित केला होता. यामध्ये कंपनीने तीन नवीन स्मार्टफोन लाॅंच केले आहेत. Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन नवीन माॅडेल लाॅंच करण्यात आली आहेत.
Samsung या नवीन स्मार्टफोनमध्ये Galaxy AI फिचर एॅड करण्यात आले आहे. सॅमसंगचा हा नवीन Galaxy AI अनेक खास AI वैशिष्ट्यांसह येतो, Live Translate, Note Assist आणि Circle to Search यांचा त्यात समावेश आहे.
ही फोन सीरीज Android 14 वर One UI 6.1 आधारित OS वर चालते. या मालिकेत डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Samsung Galaxy S24 8GB RAM सह लॉन्च करण्यात आला आहे तर Samsung Galaxy S24 Plus आणि S24 Ultra हे 12B रॅम पर्यंतच्या टॉप व्हेरियंटसह लॉन्च केले गेले आहेत.
Samsung Galaxy S24 किंमत
पहिला प्रकार: 8GB + 128GB, किंमत: $799 (सुमारे 65,500 रुपये)
दुसरा प्रकार: 8GB + 256GB, किंमत: $849 (सुमारे 70,600 रुपये)
Samsung Galaxy S24 Plus किंमत
पहिला प्रकार: 12GB + 256GB, किंमत: $ 999 (सुमारे 81,000 रुपये)
दुसरा प्रकार: 12GB + 512GB, किंमत: $ 1,119 (सुमारे 93,100 रुपये)
सॅमसंगच्या या नवीन मालिकेतील तिन्ही फोन 31 जानेवारीपासून जगभरातील निवडक बाजारपेठांमध्ये विकले जातील. त्याचवेळी, आजपासून या फोन सीरिजचे सर्व फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत कंपनीने या तीन फोनची फक्त अमेरिकन किंमत जाहीर केली आहे.
भारतासह इतर देशांमध्ये या फोनची किंमत सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. सॅमसंगने या मालिकेतील आपले दोन फोन, Galaxy S24 आणि Galaxy S24+ Amber Yellow, Cobalt Violet, Marble Grey आणि Ox Black कलर पर्यायांमध्ये सादर केले आहेत.
Samsung Galaxy S24 चे तपशील
यात 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.2-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. या फोनच्या मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10MP टेलिफोटो लेन्स आहे. पुढील भागात 12MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Exynos 2400 SoC चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 OS वर चालेल. 4000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह देखील येते. 168 ग्रॅम फोनचे वजन असेल. त्यात IP68 वॉटर आणि धूळ प्रतिरोधक वैशिष्ट्य आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह Galaxy AI आणि इतर अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत.