America – लाल समुद्रात हौथींकडून व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिका आणि अन्य १२ देशांच्या आघाडीने जोरदार इशारा दिला आहे. मालवाहू जहाजांवर केले जात असलेले हल्ले थांबवावेत, अन्यथा परिणामांना सामोरे जावे, असे या इशारा यामध्ये म्हटले आहे.
इस्रायल-हमास युद्धामध्ये पॅलेस्टिनींना पाठिंबा आणि इस्रायलच्या कारवाईला विरोध म्हणून येमेनस्थित हौथी बंडखोरांनी १९ डिसेंबरपासून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले करायला सुरुवात केली आहे.
हौथींनी आताप्रयंत २३ जहाजांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक जहाज कंपन्यांनी लाल समुद्रातील वाहतूक स्थगित केली असून खूप दूरवरून जाणार् या पर्यायी जलमार्गाचा वापर करायला सुरुवात केली आहे.
बायडेन प्रशासनाकडून हौथींच्या हल्ल्यांना दिले जाणार् या प्रत्युत्तराची सविस्तर माहिती दिली गेली नाही. अशा प्रकारचा इशारा पुन्हा दिला जाणार नाही, हे हौथींनी ध्यानात ठेवावे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
गेल्या आठवड्याच मालवाहू जहाजांवर हौथींनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारे एक संयुक्त निवेदन अमेरिकेबरोबर अन्य १२ देशांच्या आघाडीने प्रसिद्ध केले होते. या संयुक्त निवेदनावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बहारीन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड, न्यूझीलंड, सिंगापूर आणि ब्रिटनने स्वाक्षरी केली होती.
या शिवाय अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे हौथी बंडखोरांचे हे हल्ले थांबवण्याची मागणी देखील केली आहे. हौथींना आर्थिक मदत पुरवणार् या इराणनेही हौथींना सहाय्य करणे थांबवावे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. हौथींनी हल्ले न थांबवल्यास त्याचे परिणाम त्यांना भौगायला लागतील, असेही या आघाडीने म्हटले आहे.
ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्ड !
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील १२ देशांच्या आघाडीने लाल समुद्रातील जलवाहतूकीच्. रक्षणासाठी ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्ड सुरू केले आहे. सध्या या आघाडीच्यावतीने अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनची लढाऊ जहाजे लाल समुद्रामध्ये तैनात करण्यात आली आहेत.
एस सेंट्रल कमांडची विमानवाहू नौका आणि या नौकांवरील हेलिकॉप्टर हौथींच्या बोटींवर लक्ष ठेवून असतात. या हेलिकॉप्टरने हौथींच्या ३ बोटी बुडवल्या तर गेल्या आठवड्यात अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडली आहेत. हौथींना मदत करणार् या इराकमधील काही ठिकाणांवर अमेरिकने हवाई हल्लेही केले आहेत.