Rashmika Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) दाक्षिणात्यसह बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतेच ती अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकली. ‘ॲनिमल’मध्ये रश्मिका मंदान्नाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
रश्मिका मंदान्नाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ‘ॲनिमल’च्या यशानंतर रश्मिका मंदान्ना सध्या सुट्ट्या इन्जॉय करत आहे. या सुट्ट्या इन्जॉय करताना काढलेला फोटो रश्मिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रस्त्यावर मधोमध उभं राहून रश्मिकाने हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये रश्मिकाने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. तसेच तिने पाठीमागे ब्लॅक कलरची बॅग अडकवलेली दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करताना रश्मिका मंदान्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधी कधी तुम्ही थांबून फक्त विचार करा. हे सर्व कसे घडले? हे सर्व कधी, काय झाले? आणि हे सर्व घडले याचा मला खूप आनंद आहे… कृतज्ञ, शांत आणि आनंदी आहे. हे सर्व ते आहे ज्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले आहे. मला ते कळत नाही आणि मी अशा गोष्टीकडे धावत राहते ज्याबद्दल मला माहित सुद्धा नाही. परंतु योग्य लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला हे जाणवते की कधी थांबून अनुभवले पाहिजे की ते हेच आहे. ही तीच गोष्ट आहे ज्याचे स्वप्न पाहत ही छोटी मुलगी मोठी झाली.’
रश्मिका मंदान्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका ‘अॅनिमल’सह ‘गुडबाय’ आणि ‘मिशन मजनू’ या चित्रपटात देखील झळकली होती. ‘ॲनिमल’नंतर रश्मिका मंदान्ना बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चाहते रश्मिकाच्या ‘पुष्पा 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.