लाइफस्टाईलच्या क्षेत्रात देशातील महिलांचा प्रभाव वाढत आहे. मागील काही काळा पासून देशात व्यावसायिक महिलांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. भारतीय महिलांचा आवाज देशभर आणि परदेशात घुमत आहे. यापैकी एका महिलेचे नाव सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे फाल्गुनी नायर…
फाल्गुनी नायर या व्यावसायिक महिला आहेत. फाल्गुनी नायर देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहे. फाल्गुनी ही शेल्फ मेड महिला अब्जाधीश आहे. त्यांना हे स्थान कोणत्याही वारशाने मिळालेल्या कंपनीच्या किंवा आई-वडिलांच्या पैशाच्या जोरावर मिळवले नाही, तर त्यांनी स्वतःची यशोगाथा मेहनतीने लिहिली आहे. फाल्गुनी नायर यांना भारतीय स्टार्टअप्सची राणी म्हटले जाते. ती Nykaa ची संस्थापक आहे.
19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबईत जन्मलेल्या फाल्गुनी या व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या. त्यांनी AF फर्ग्युसन कंपनीत व्यवस्थापन सल्लागार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1993 मध्ये कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये त्या सामील झाल्या, आणि तेथे 20 वर्षे काम केले. 2005 मध्ये त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक झाल्या आणि 2012 पर्यंत या पदावर होत्या.
नोकरीत असताना त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. एमबीए करतानाच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. वयाच्या ५० व्या वर्षी फाल्गुनीने यांनी चांगली नोकरी सोडली आणि २०१२ मध्ये Nykaa सुरू केली. Nykaa हा संस्कृत शब्द ‘नायिका’ पासून प्रेरित आहे. याचा अर्थ मुख्य भूमिका साकारणारी ‘अभिनेत्री’ असा होतो.
ऑनलाइन उत्पादने विक्री
फाल्गुनी नायर यांनी भारतीय महिलांचे सौंदर्य वाढवण्याची संधी पाहिली आणि 2012 मध्ये ब्युटी-वेलनेस उत्पादने विकण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. फाल्गुनी नायर यांचा हा उपक्रम पहिल्या दिवसापासून खूप यशस्वी झाला, लवकरच त्यांनी फॅशन उत्पादनांसाठी एक व्यासपीठ म्हणून लोकप्रिय कंपनी बनवली. 2014 मध्ये, Sequoia Capital India ने Nykaa मध्ये $1 दशलक्ष गुंतवणूक केली. यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीत पैसे गुंतवले. हळूहळू कंपनीचा विस्तार होऊ लागला.
फाल्गुनी नायर सध्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 21,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फाल्गुनी न्याका येथे 1600 हून अधिक लोकांच्या टीमचे नेतृत्व करते. Nykaa ही प्रामुख्याने एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे जी Lakme, Kaya Skin Clinic, L’Oréal Paris, इत्यादींसह सर्व आघाडीच्या ब्रँड्समधील सौंदर्य आणि निरोगीपणा उत्पादने देते. त्याची देशभरात 17 दुकाने आहेत.