Ananya Pandey : आज ख्रिसमसनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बॉलीवूड कलाकार देखील नवीन वर्षाच्या उत्सवात रंगली आहेत. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी काही सेलिब्रिटी देशाबाहेर गेले आहेत, तर काही सेलिब्रिटी आपल्या प्रियजनांसोबत सेलिब्रेट करत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेनेही (Ananya Pandey) तिच्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यंदाचा ख्रिसमस अनन्यासाठी खूप खास आहे, कारण ती तिच्या नवीन घरी ख्रिसमस साजरा करत आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अनन्याने रेनडिअर हेअरबँड आणि रंगीबेरंगी स्वेटर घातलेली दिसत आहे. दुसर्या चित्रात सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री त्यावर भेटवस्तू असलेले दिसत आहे. आणखी एका फोटोत अनेक स्वादिष्ट पदार्थ दिसत आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना अनन्याने लिहिले की, “माझ्या घरी पहिला ख्रिसमस, सिक्रेट सांता, भरपूर खाणे आणि माझ्या जुन्या मित्रांसोबत हसणे, यापेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही.”
View this post on Instagram
अनन्या पांडेने नुकतेच स्वतःसाठी नवीन घर घेतले होते. आपल्या नवीन घरातील पूजाचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनन्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ‘खो गये हम कहाँ’ हा चित्रपट 26 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि कल्की कोचलिन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. यासह अनन्या लवकरच अर्जुन वरण सिंग दिग्दर्शित चित्रपटात देखील दिसणार आहे.